Tue, Feb 19, 2019 20:27होमपेज › Marathwada › उमरगा :  अंमली पदार्थाच्या कारखान्यावर छापा

उमरगा :  अंमली पदार्थाच्या कारखान्यावर छापा

Published On: Jan 13 2018 12:20AM | Last Updated: Jan 12 2018 11:20PM

बुकमार्क करा
उमरगा: प्रतिनिधी 

तालुक्यातील जकेकुर चौरस्ता येथील औद्योगिक वसाहतीत असलेल्या एका प्रगती इलेक्ट्रीकल वर्क्स येथील गोदामावर दोन दिवसापूर्वी बेंगळूरच्या केंद्रीय महसूल गुप्तचर विभागाने धाड टाकली. यामध्ये पन्नास लाख रुपयाची अमली पदार्थाची पावडर व कच्चा माल जप्त केला. सदरच्या गोदामाची रात्रभर पथकाकडून सखोल तपासणी सुरू होती.

याबाबतची माहिती अशी की, मागील काही दिवसापूर्वी हैद्राबाद येथे ४६ किलो अमली पदार्थांचे पावडर पोलिसांनी जप्त केले होते. त्यानुसार पुढील तपास संबंधित यंत्रणेने केल्यानंतर चौकशी दरम्यान याचे धागेदोरे उमरगा येथील जकेकुर-चौरस्ता येथे असलेल्या औद्योगिक वसाहतीत याचे गोडाऊन असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुरुवारी दुपारी केंद्रीय महसूल गुप्तचरच्या  पथकाने औद्योगिक वसाहतीत असलेल्या प्रगती इलेक्ट्रीकल वर्कच्या गोडाऊनवर कारवाई केली. त्‍यावेळी अमली पदार्थाच्या गोळ्या तयार करण्यासाठी लागणारे मिथोक्युलोन अर्धा किलो  जप्‍त करण्यात आली. या पावडरची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पन्नास लाख रुपये किमंत आहे. यावेळी अद्याप गोडाऊनमधील अन्य कच्च्या मालाची रात्री पथकाकडून तपासणी सुरू होती. केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेने कारवाई केलेले गोडाऊन पुणे येथील सुरेश राजनाळे यांच्या मालकीचे असून त्यांनी सदरचे गोदाम संबंधित मेडिसिन कंपनीसाठी भाडे तत्वावर देण्यात आल्याची माहिती असून स्थानिक पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक दिनेश जाधव यांच्याकडून पुढील तपास करण्यात येत आहे.