Sun, Mar 24, 2019 06:12होमपेज › Marathwada › उखंडा गावात पडला विकासाचा प्रकाश

उखंडा गावात पडला विकासाचा प्रकाश

Published On: Aug 17 2018 1:35AM | Last Updated: Aug 17 2018 1:35AMपाटोदा : प्रतिनिधी

गावाचे नाव उखंडा असले तरी प्रकाश देणारे नेतृत्व लाभल्यास उखंडा नाव असलेले गावही स्मार्ट बनू शकते हे जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कवठेकर यांनी विकासाभिमुख राजकारणाच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. नुकतेच उखंडा गावास स्मार्ट ग्राम पुरस्काराने गौरविण्यात आले.

निसर्गाचे वरदान लाभलेल्या पाटोदा तालुक्यातील नायगाव मयूर अभयारण्याच्या कुशीत उखंडा गाव वसलेले आहे. येथील ग्रामपंचायत जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कवठेकर यांच्या ताब्यात आल्यानंतर त्यांनी गावाच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा तयार केला. 

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस यांच्या माध्यमातून विकासाचे अनेक प्रकल्प उखंडा गावात राबविले. उखंडा गावातील शाळा, ग्रामपंचायत इमारत अतिशय देखणी झाली आहे. विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि दर्जेदार कामामुळे उखंडा स्मार्ट ग्राम बनले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी प्रमाणपत्र देऊन स्मार्ट ग्राम बनलेल्या उखंडा गावाचा गौरव केला.