Sun, Sep 23, 2018 02:11होमपेज › Marathwada › कॉलर उडवण्यावरुन उदयनराजेंचा पवारांना चिमटा  

कॉलर उडवण्यावरुन उदयनराजेंचा पवारांना चिमटा  

Published On: Jun 03 2018 3:19PM | Last Updated: Jun 03 2018 3:23PMबीड : पुढारी ऑनलाईन 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या चौथ्या स्मृतीदिनानिमित्त गोपीनाथ गडावर कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला राज्यातील सर्व राजकीय पक्षातील मोठे नेते हजर होते. पण, या कार्यक्रमात उदयनराजेंनी जोरदार बॅटिंग केली. 

उदयनराजेंनी गोपीनाथगडावर केलेल्या आपल्या भाषणात शरद पवारांच्या कॉलर उडवण्यावरून केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले 'आजकाल अनेक जणांना प्रश्न पडतो की उदयनराजे नेहमी कॉलर का उडवतात? त्याचे कारण आज मी सांगतो. गोपीनाथ मुंडे नेहमी सांगत लोकांसाठी जो माणूस झटतो आणि आयुष्यभर काम करतो त्यालाच कॉलर उडवायचा अधिकार आहे. कारण नसताना अलीकडच्या काळात आजी माजी मंत्र्यांनी त्यावर टीका टिपण्णी केली आहे.’ 

काही दिवसांपूर्वी साताऱ्यामध्ये ‘आपल्यासमोर सर्वांच्या कॉलर खाली असतात’ अस म्हणत शरद पवारांनी उदयनराजेंच्या कॉलर उडवण्यावरुन चिमटा काढला होता. 

वाचा : सत्तापरिवर्तन गोपीनाथ मुंडेंमुळेच : मुख्यमंत्री

Tags : Udayanraje Bhosale, collar, sharad pawar,gopinath gad, beed, gopinath munde 4th death anniversary