Sat, Feb 16, 2019 00:28होमपेज › Marathwada › बॉडी स्प्रेचा स्फोट ; दोघे जखमी

बॉडी स्प्रेचा स्फोट ; दोघे जखमी

Published On: Jun 12 2018 11:33AM | Last Updated: Jun 12 2018 11:33AMबीड :

घरासमोरील कचरा पेटविताना झालेल्या स्फोटात दोन मुले जखमी झाली. ही घटना रविवारी घडली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सदरील घटना बॉडी स्प्रेच्या स्फोटमुळे झाल्याचे पोलिसांनी सांगितले. बीड शहरातील शाहुनगर मधील हनुमान चौक येथील चिंचोलकर यांच्या मालकीच्या घरामध्ये शंकर बाबर व हरिश्‍चंद्र सांगळे हे किरायाने रहात होते. आठवड्यापूर्वीच या दोघांनी रूम सोडली. यानंतर रूम झाडलेला कचरा घरासमोरील मोकळ्या जागेत टाकला होता.

हा कचरा जाळून टाकावा म्हणून विमल सांगळे यांनी पेटून दिला. त्यात बॉडी स्प्रेचा डबा देखील होता. आगीत डबा जळाल्यानंतर अचानकच स्फोट झाला. तेथे बाजुला असलेले वैष्णवी सुधीर कारगुडे (वय 6) व यश हरिश्‍चंद्र सांगळे (वय 7) हे जखमी झाली. ही घटना सोमवारी पोलिसांना माहिती होताच शिवाजी नगर पोलिस ठाण्यातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी बॉम्ब शोधक व नाशक पथकानेही पाहणी केली. घटनेची पोलिसांनी नोंद घेतली आहे.