Wed, Mar 27, 2019 03:58होमपेज › Marathwada › उपविभागीय अधिकारी चेतन गिरासेंच्या निषेधार्थ तुळजापुरात मोर्चा

उपविभागीय अधिकारी चेतन गिरासेंच्या निषेधार्थ तुळजापुरात मोर्चा

Published On: Jul 20 2018 6:25PM | Last Updated: Jul 20 2018 6:25PMतुळजापूर : प्रतिनिधी 

मराठा समाज बांधव मराठा आरक्षण, शेतकरी कर्जमाफी, शैक्षणिक सवलत याबाबत आपल्या मागण्यांचे निवेदन तुळजापूरचे तहसीलदार यांना देण्यासाठी येथील तहसील कार्यालयात गेले होते. त्यावेळी निवेदन देताना तेथे उपस्थित असलेले उपविभागीय अधिकारी चेतन गिरसे यांनी निवेदनकर्त्यांना अरेरावीची भाषा वापरुन अपमानस्पद वागणूक दिली. या निषेधार्थ सकल मराठा समाजबांधवांनी शुक्रवार दि. २० रोजी तुळजापूर बंदची हाक देत शिवाजी पुतळ्यापासून शेकडोंच्या संख्येने मोर्चा काढला. यावेळी गाढवाच्या गळ्यात निषेधाचे फलक अडकवून धिंड काढण्यात आली. येथील शिवाजी पुतळ्यापासून सकाळी १० वा. सुरु झालेला मोर्चा शिवाजी चौक, आंबेडकर चौक, भवानी रोड, तुळजाभवानी मंदीर, आर्य चौक, कमानवेस, मंगळवार पेठ येथून शेकडोंच्या संख्येने मोर्चा बसस्थानकाजवळील चौकात दाखल झाला. तेथे निवेदन देताना उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे यांनी मराठा समाजबांधवांना दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा तीव्र निषेध व्यक्त करून त्यांना त्वरीत निलंबित करावे अशी मागणी केली. यावेळी बसस्थानकाजवळील चौकात रस्ता रोको करण्यात आला. त्यामुळे वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागल्या होत्या.

याप्रसंगी बोलताना वक्त्यांनी उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे यांच्यावर सडकून टिका  करून त्यांच्या निलंबनाची मागणी केली. राज्यसरकार मराठा समाजाच्या न्याय्य मागण्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असून अशा मुजोर अधिकाऱ्यांना पाठीशी घालून जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार करत आहे, अशी टिका करून सरकारचा निषेध करण्यात आला.

यावेळी त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. उपविभागीय अधिकारी गिरासे यांना निलंबित करावे या मागणीचे निवेदन यावेळी तहसीलदार दिनेश झांपले यांच्याकडे वरीष्ठ अधिकारी आणि प्रशासनाकडे पाठवण्यासाठी सुपूर्द करण्यात आले.