Wed, Jan 23, 2019 09:51होमपेज › Marathwada › शिवजयंतीनिमित्त तुळजाभवानीमातेची भवानी तलवार अलंकार महापूजा

शिवजयंतीनिमित्त तुळजाभवानीमातेची भवानी तलवार अलंकार महापूजा

Published On: Feb 20 2018 1:17AM | Last Updated: Feb 20 2018 1:17AMतुळजापूर ः तालुका प्रतिनिधी  

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या 388 व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीमातेची सोमवारी भवानी तलवार अलंकार महापूजा बांधण्यात आली. 

संकटाला धैर्याने तोंड देण्यासाठी छत्रपती शिवरायांना स्फूर्ती, शक्‍ती, प्रेरणा प्रदान करणारी कुलदैवता अर्थात शक्‍ती देवता श्री तुळजाभवानीमातेने आशीर्वादरूपी भवानी तलवार प्रदान करतानाचा प्रसंग सोमवारी खास शिवजयंतीनिमित्त विशेष महापूजेच्या रूपाने सादर करण्यात आला होता. भवानीमातेची तलवार स्वीकारून छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची निर्मिती केल्याचा इतिहास आहे. आज मातेच्या या विशेष महापूजेचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातील लाखो शिवभक्‍त, शिवप्रेमींनी तुळजापुरात मोठी गर्दी केली होती. मातेच्या दर्शनाने तुळजापुरात मशाल प्रज्वलित करून ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष करीत हजारो तरुण शिवभक्‍त आपापल्या गावाकडे शिवज्योत नेताना दिसून आले.