Thu, Sep 20, 2018 06:56होमपेज › Marathwada › तुळजाभवानीच्या मंचकी निद्रेस आजपासून प्रारंभ

तुळजाभवानीच्या मंचकी निद्रेस आजपासून प्रारंभ

Published On: Dec 18 2017 2:36AM | Last Updated: Dec 17 2017 11:41PM

बुकमार्क करा

तुळजापूर : तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तथा शक्‍तिदेवता श्री तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवापूर्वीच्या मंचकी निद्रेस सोमवारपासून सोमवती अमावास्येला सायंकाळी प्रारंभ होत आहे. त्याअनुषंगाने मातेच्या शेजघरातील साफसफाईचे काम युद्धपातळीवर सुरू होते. मातेच्या निद्रेसाठी चांदीचा पलंग सज्ज आहे.

तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला मंगळवारी (दि. 26) दुपारी 12 पासून घटस्थापनेने प्रारंभ होणार आहे. सोमवारी सायंकाळी मातेच्या पंचामृत अभिषेक पूजेनंतर शोड्षोपचार पूजा, धूपारती, अंगारा निघाल्यानंतर मातेची मुख्य मूर्ती चांदीच्या पलंगावर निद्रिस्त केली जाणार आहे. ही निद्रा 26 डिसेंबरच्या पहाटेपर्यंत चालणार आहे. 9 दिवसांच्या निद्रा सौख्यानंतर मातेची मूर्ती सिंहसनाधिष्ठीत करण्यात येऊन मातेचा पंचामृत अभिषेक व शोड्षोपचार पूजेनंतर दुपारी 12 वाजता घटस्थापना होऊन शाकंभरी नवरात्र महोत्सवास प्रारंभ होणार आहे. या नवरात्रोत्सवाला छोटा दसराही संबोधण्यात येते. या नवरात्रोत्सवाची सांगता 2 जानेवारीला घटोत्थापनाने होणार आहे.