Tue, Jun 18, 2019 20:19होमपेज › Marathwada › लातुरजवळ कर्नाटकाची बस पेटवण्याचा प्रयत्न

लातुरजवळ कर्नाटकाची बस पेटवण्याचा प्रयत्न

Published On: Jul 22 2018 7:11PM | Last Updated: Jul 22 2018 7:11PMलातूर : प्रतिनिधी

लातूर शहराजवळ असलेल्या पेठ गावी कर्नाटक आगाराची लातूर- नांदेड बस मराठा क्रांती मोर्चाच्या अज्ञात युवकांनी पेटवण्याचा प्रयत्न केला. ही घटना आज, रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. मात्र बस चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्यावतीने सर्वत्र आंदोलन छेडण्यात आले आहे. लातूरमध्ये देखील याचे पडसाद उमटत आहेत. आज, रविवारी सांयकाळच्या सुमारास पेठनजीक दहा ते पंधरा युवक दुचाकीवरुन आले व त्यांनी कर्नाटक आगाराची बस अडवली. आणि बसमधील सर्व प्रवाशांना बसमधून बाहेर येण्यास सांगितले. तर त्यांनतर एक मराठा लाख मराठा, अशी घोषणा देत या तरूणांनी बसवर दगडफेक केली. त्याचबरोबर बसच्या मागील टायरवर पेट्रोल टाकून आग लावून पसार झाले. मात्र चालकाने तातडीने ही आग विझवली यामुळे मोठा अनर्थ टळला.