Sat, May 30, 2020 13:31होमपेज › Marathwada › लातूरनजीक भीषण अपघातात ७ ठार, १३ जखमी

लातूरनजीक भीषण अपघातात ७ ठार, १३ जखमी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

प्रतिनिधीः लातूर

थांबलेल्या टेम्पोला ओव्हरटेक करताना दोन क्रुझर आदळून झालेल्या भीषण अपघातात ७ ठार तर १३जण जखमी झाले. लातूर नांदेड राज्य मार्गावरील कोळपा पाटीजवळ पहाटे चार वाजता हा अपघात झाला. जखमींवर लातुरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लातूररोड येथे पहाटे रेल्वेला उतरलेले प्रवाशी घेऊन क्रुझर (एमएच २४ व्ही ११०४) गाडी लातुरकडे भरधाव वेगात येत होती. कोळपा पाटीनजीक असलेल्या गोरक्षणजवळ मालवाहू टेम्पो थांबला होता. त्याला ओव्हरटेक करीत असताना विरुध्द दिशेने येत असलेल्या दुसऱ्या क्रुझरवर जोरात आदळली. (एमएच १३ बीएन २४५४) यात प्रवाशी असलेल्या क्रुझरचा चक्काचूर झाला. क्रुझरचे टप तुटून दूरवर जाऊन पडले. त्यातील सहा जण जागीच ठार झाले तर चार गंभीर जखमी झाले. त्यातील एकाचा रुग्णालयात उपचरादरम्यान मृत्यू झाला. दुसऱ्या क्रुझरमधील नऊ जण जखमी झाले.

हा अपघात झाला त्यावेळी दूरवर जोराचा आवाज आला त्यामुळे कोळपा पाटीजवळील धाब्यावर असलेले नागरिक व ट्रकवाले त्या दिशेने धावले. त्यांनी अपघातग्रस्तांना कारबाहेर काढले. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. अपघाताची माहिती कळताच पोलिस व १०८ च्या दोन रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या व जखमींना उपचारार्थ तातडीने लातुरला हलविण्यात आले.

अपघातातील मृतांची नावे
विजय तुकाराम पांदे (वय ३०, रा. दापूर, ता. सिन्नर, जि. नाशिक), तुकाराम ज्ञानोबा दळवे (वय ३५, रा. दापेगाव, ता. औसा), उमाकांत सोपान कासले (वय ४०), मीना उमाकांत कासले (वय ४०, दोघेही रा. रेणापूर नाका, लातूर), शुभम शरद शिंदे (वय २४, रा. बेलपिंपळगाव, ता. जि. अहमदनगर), मनोज चंद्रकांत शिंदे (वय २५, रा. वैशालीनगर, बाभळगाव) व दत्तू बळीराम शिंदे (वय ३५, रा. हिंपळनरी, ता. मुखेड, जि. नांदेड

जखमींची नावे
अर्जून रामराव राठोड (वय २७, परतूर, जि. जालना), शब्बीर बालेखॉं खान (वय १९, रा. निलंगा), कृष्णा दौलत भवर (वय १९, रा. नाशिक), मलिकार्जून गोविंद होडे (वय ३२, गातेगाव, ता. लातूर), वैष्णवी धनंजय भालेराव (वय १८, दिपज्योतीनगर, लातूर), मदन विठ्ठल पवार (वय २३, रा. औरंगाबाद), शेख इम्रान इम्तेयाज (वय १९, रा. चाकूर), गणेश उमाकांत कासले (वय १२, रा. रेणापूरनाका, लातूर), विद्या धनंजय भालेराव (वय ४२, दिपज्योतीनगर, लातूर), ज्ञानेश उमाकांत कासले (वय ११, रा. रेणापूरनाका, लातूर), रामराव मारोती घुगरे (वय ४९, रा. नाशिक), रविदास जयराम सानप (वय ३४, रा. नवी मुंबई) व अजय दयानंद वाघमारे (वय २४, लातूररोड, लातूर.)