Fri, Jan 18, 2019 00:51होमपेज › Marathwada › ग्रहणकाळात तुळजाभवानी सोवळ्यात

ग्रहणकाळात तुळजाभवानी सोवळ्यात

Published On: Jan 31 2018 7:27PM | Last Updated: Jan 31 2018 7:27PMतुळजापूर : प्रतिनिधी

आज, माघ पौर्णिमा, बुधवार दि. ३१ रोजीच्या खग्रास चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मातेच्या धार्मिक विधींत बदल करण्यात आला आहे. ग्रहणकाळात देवी सोवळ्यात असणार असून सायंकाळी ५.१५ ते रात्री ८.४२ वाजेपर्यंत देवीला शुभ्र वस्‍त्र नेसवण्यात आले आहे. दरम्यान या काळातही भाविकांसाठी देवीचे दर्शन खुले ठेवण्यात आले आहे.    

बुधवारी पौर्णिमेदिनी खग्रास चंद्रग्रहण असल्यामुळे सायंकाळी ४.४५ वाजता पूजेची घाट होऊन त्यानंतर तुळजाभवानी मातेस शुद्ध जलाभिषेक स्नान घालण्यात आले.

ग्रहण कालावधी रात्री ८.४२ वा. पूर्ण झाल्यानंतर रात्री ९.०० वा.च्या सुमारास अभिषेकपूजेस प्रारंभ होईल. देवीच्या पंचामृत अभिषेकानंतर रात्री १०.३० वा.च्या सुमारास देवीचा छबिना काढण्यात येऊन प्रक्षाळ पूजा संपन्न होणार आहे.