Fri, Mar 22, 2019 06:16
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › आज बीड जिल्ह्यात तिरंगा एकता रॅली

आज बीड जिल्ह्यात तिरंगा एकता रॅली

Published On: Jan 26 2018 1:18AM | Last Updated: Jan 26 2018 12:36AMबीड : प्रतिनिधी

प्रजासत्ताक दिनी जिल्ह्यात शुक्रवारी (दि.26) भव्य तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे.  बीड शहरात जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत या  रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी होऊन एकतेचा संदेश जगासमोर ठेवावा असे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी केले आहे. 

1950 साली  याच दिवशी देशाची घटना जी आपल्या लोकशाहीचे आणि एकतेचे प्रतिक आहे ती अंगिकारली गेली. त्याची आठवण म्हणून 26 जानेवारी रोजी राज्याच्या ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री पंकजा मुंंडे यांच्या उपस्थितीत बीड शहरात आणि जिल्ह्यात तिरंगा एकता यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. बीड शहरातील नगर रोड भागात असणार्‍या हुतात्मा स्मारकापासून सकाळी 10 वाजता मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. 

हुतात्मा स्मारकापासून शिवाजी महाराज चौक-बलभीम चौक-धोंडीपुरा-माळीवेस-मार्गे ही यात्रा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या अभिवादन करून या तिरंगा रॅलीचा समारोप करण्यात येणार आहे. 

या ठिकाणी पवित्र अशा संविधानाचे पूजन होणार आहे. त्याचबरोबर या यात्रेत थोर पुरुषांच्या वेशभूषेतील बाल कलावंत मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार आहेत तर ठिकठिकाणी या यात्रेच्या स्वागातासाठी पुष्पवृष्टी अनेक ठिकाणी नागरिकांच्या वतीने उत्स्फूर्तपणे करण्यात येणार आहे. 

बीड शहरात होणार्‍या या ऐतिहासिक अशा तिरंगा एकता यात्रेत मोठया प्रमाणावर युवक, महिला त्याचबरोबर सेवाभावी संस्था, समाजिक संघटना मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार असून   पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांच्यासह सुभाष धस, जगदिश गुरखुदे, विक्रांत हजारी, कल्याण आखाडे, स्वप्नील गलधर, नवनाथ शिराळे, राजेंद्र बांगर, चंद्रकांत फड, अजय सवाई, डॉ. लक्ष्मण जाधव, मनोज पाटील, सुनील मिसाळ, संध्या राजपूत, संदीप उबाळे आदींनी केले आहे.

माजलगाव ः देशाचा प्रजासत्ताक दिन माजलगावमध्ये विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. यावेळी शिवाजी चौकात झेंडा वंदन, तसेच भारत माता व संविधानाचे पूजन व पठण आ.आर.टी.देशमुख यांच्या हस्ते होणार आहे .

26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन चांगला धूमधडाक्यात साजरा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शिवाजी चौकात आ.आर.टी.देशमुख यांच्या हस्ते झेंडा वंदन भारत माता व संविधानाचे पूजन व वाचन होणार आहे, संभाजी चौक ते झेंडा चौक तिरंगा एकता यात्रेचे आयोजन करण्यात आल आहे. या वेळी समाजाच्या एकजुटीचे प्रदर्शन मोटार सायकल रॅलीच्या माध्यमातून माजलगाव वासियांना दिसणार आहे. या तिरंगा यात्रेचे आयोजना संदर्भातील नियोजन बैठक संपर्क कार्यालयात पार पडली. या वेळी आ.आर.टी.देशमुख, डॉ.आनंदगावकर, माजी सभापती नितीन नाईकनवरे, हनुमंत कदम, बबनराव सोळंके व पक्ष विस्तारक ईश्वर पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. शहरातील सर्व नागरिक,व्यापारी, डॉक्टर, वकील, शेतकरी, विद्यार्थी, शिक्षक तसेच सर्व राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांनी या तिरंगा यात्रेस व संविधान पूजनास सकाळी 9 वाजता संभाजी चौकात येऊन आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन आ.आर.टी.देशमुख यांनी केले आहे.

परळी येथील यात्रेचा मार्ग
परळी येथे शिवाजी चौकातून निघणारी ही रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, एकमिनार चौक, भवानीनगर, आर्य समाज, टॉवर, गणेशपार, अंबेवेस, नेहरू चौकातून टॉवर मार्गे होईल. परळीच्या प्रमुख मार्गावरून दुचाकी वाहनांच्या रॅलीचे मोंढा विभागात यात्रेचा समारोप होणार आहे. पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत  परळी येथे आज तिरंगा एकता यात्रा व मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मुन्ना काळे  यांनी केले आहे.

महिलाही होणार सहभागी
भाजपच्या वतीने जिल्हाभरात आयोजित करण्यात आलेल्या या यात्रेत महिलांचाही सहभाग राहणार आहे. भाजपच्या महिला पदाधिकार्‍यांबरोबरच शहरातील महिलाही सहभागी होणार आहेत.