Thu, Apr 25, 2019 07:28होमपेज › Marathwada › 61 मजुरांवर उपासमारीची वेळ

61 मजुरांवर उपासमारीची वेळ

Published On: Jul 09 2018 1:04AM | Last Updated: Jul 09 2018 1:04AMएरंडेश्‍वर : प्रतिनिधी

भारती कॅम्प ते एरंडेश्‍वर दरम्यानच्या जोडरस्त्यावर काम करणार्‍या तब्बल 61 मजुरांचे हजेरी पत्रक महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत काढण्यात गटविकास अधिकारी यांच्याकडून टाळाटाळ होत असल्याची तक्रार जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. 

सदरील जोडरस्त्याचे हजेरी पत्रक 18 ते 24 जून या कालावधीत निघालेले आहे. संबंधित हजेरी पत्रकाची मोजमाप पुस्तिका 89217 मध्ये नोंदणी केली गेली आहे. ही नोंदणी करून त्या हजेरी पत्रकावर ग्राम रोजगार सेवक, ग्रामसेवक, लेखाधिकारी, पॅनल तांत्रिक अधिकारी, 3 मजूर तसेच मोजमाप पुस्तीकेवर पॅनल तांत्रिक अधिकारी, लेखाधिकारी, रोजगार सेवक व 2 मजुर यांच्या स्वाक्षर्‍या करून ते अंतीम मान्यतेसाठी हजेरीपत्रक व मोजमाप पुस्तीका गटविकास अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आल्या. यावेळी एरंडेश्‍वर गटामधील  3 पालक तांत्रिक अधिकार्‍यांची दिशाभूल केली. त्यामध्ये राऊत, डोंगरदिवे, नेवल या पालक तांत्रिक अधिकार्‍यांचा समावेश आहे. त्यांच्याशी संपर्क केला असता. तिनही अधिकार्‍यांनी हजेरीपत्रक व मोजमाप पुस्तीकेवर स्वाक्षरी करण्यास नकार देत सदरील काम आमच्या कार्यक्षेत्रात येत नाही, असे स्पष्ट केले.  बीडीओंकडे संबंधित मजूर कागदपत्रे घेऊन गेले असता, त्यांनी 25 हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोपही सीईओंकडे दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे. या  निवेदनावर आयोध्या काळे, दत्ता काळे, गजानन काळे, विठ्ठल गरूड, अंकुश सातपुते, विकास सातपुते, चंद्रकांत काळे, मारुती घोरबांड, आत्माराम काळे, गजानन दमाणे, दिलीप काळे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.