Mon, Apr 22, 2019 11:43होमपेज › Marathwada › तीन शाळकरी मुलांचा तलावात बुडुन मृत्यू 

तीन शाळकरी मुलांचा तलावात बुडुन मृत्यू 

Published On: Dec 20 2017 3:55PM | Last Updated: Dec 20 2017 3:55PM

बुकमार्क करा

अंबाजोगाई : प्रतिनिधी

अंबाजोगाई तालुक्यातील कुसळवाडी लमाण तांड्यावरील तीन शाळकरी मुलांचा तलावात बुडुन मृत्यू झाला. ही -हदयद्रावक घटना मंगळवारी दुपारी घडली. विष्णू परमेश्वर चव्हाण ( १५ ), अर्जुन परमेश्वर राठोड ( १४ ) व नितीन पिंटु चव्हाण अशी मृत मुलांची नावे आहेत. 

विष्णू परमेश्वर चव्हाण, अर्जुन परमेश्वर राठोड  व नितीन पिंटु चव्हाण हे तिघे लातुर व पानगावला शिकत होते.  वेळ अमावस्या निमित्त कुसळवाडी येथे गावाकडे आले होते. मंगळवारी  दुपारी गावशेजारी असलेल्या तलावात पोहण्यासाठी गेले. पोहत असतांना  पाण्याचा अंदाज न आल्याने त्या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी बर्दापूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.