Wed, Jul 15, 2020 23:12होमपेज › Marathwada › घरफोडी करून पावणे तीन लाखांचा एेवज लंपास 

घरफोडी करून पावणे तीन लाखांचा एेवज लंपास 

Published On: Sep 12 2019 9:13AM | Last Updated: Sep 12 2019 9:13AM
सोनपेठ (परभणी) : प्रतिनिधी 

गंगाखेड तालुक्यातील व सोनपेठ पोलिस ठाण्याअंतर्गत येत आसलेल्या शेंडगा येथील सुंदर सखाराम तिडके यांच्या घराचा मुख्य दरवाजा तोडून घरफोडी झाल्याची घटना मंगळवार दि. १० सप्टेंबर रोजी मध्यरात्री घडली.

सुंदर तिडके हे आपल्या कुटुंबासह सोमवार दि. ९ सप्टेंबरच्या रात्री गाढ झोपेत असताना चोरट्यांनी बाहेरच्या गेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.

यावेळी घरातील दोन लाख ऐंशी हजार रूपये किंमतीचे दागिने व रोख पन्नास हजार चोरट्यांनी चोरून नेले. याबाबत सुंदर तिडके यांच्या फिर्यादीवरून सोनपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे हे करत आहेत.