Wed, Nov 21, 2018 05:23होमपेज › Marathwada › झेंडा काढल्यावरून हाणामारी; दोन पोलिसांसह दहा जखमी

झेंडा काढल्यावरून हाणामारी; दहा जण जखमी

Published On: Jul 07 2018 3:10PM | Last Updated: Jul 07 2018 4:44PMगेवराई ( जि. बीड) : प्रतिनिधी  

कल्याण विषाखपट्टणम राष्ट्रीय महामार्गावर गेवराई तालुक्यातील गढी पासून पंधरा- वीस किलोमीटर अंतरावरील मारफळा फाट्यावर झेंडा काढल्याचा कारणावरून दोन गट समोरासमोर आले. 

या दोन गटात तुंबळ मारहाण झाली. या मारहाणीत बंदोबस्तासाठी आलेल्या दोन पोलिसांसह दहा जण जखमी झाले आहेत. घटना स्थळावर तणावपूर्ण वातावरण असून मोठा पोलीस फौज फाटा तैनात केल्याने या ठिकाणी पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे.