Sat, May 25, 2019 22:42होमपेज › Marathwada › एमएच ४४...चा नाद करायचा नाही

एमएच ४४...चा नाद करायचा नाही

Published On: Apr 29 2018 2:08AM | Last Updated: Apr 29 2018 2:00AMपरळी : रवींद्र  जोशी 

सूर्य किती आग ओकू शकतो व त्याची काय दाहकता असू शकते याचा अनुभव सध्या संपूर्ण महाराष्ट्र घेत आहे. महाराष्ट्रातील सर्वच ठिकाणी सरासरी तापमान 44 अंश सेल्सियस आहे. एका अर्थाने तापमानात एम.एच.44 ही स्थिती निर्माण झाली आहे. जीवाची लाही लाही होत असून उष्माघाताची शक्यता बळावली आहे.  सामान्यतः विनोदात किंवा अस्मितादर्शक वापरण्यात येणारी एम.एच.44 चा नाद करायचा नाही ही शाब्दिक ट्रिक उन्हामुळे मात्र खरी होताना दिसत आहे.          

उन्हाळ्यात बाहेरील दिवसाचे तापमान 42 सेल्शियस हून अधिक असते. एरवी उन्हामध्ये शरीरातील घाम निर्माण करणारे केंद्र बाहेरील तपमान काहींही असो शरीराचे तापमान 37.7  से. कायम ठेवतात. ऊन आणि गरम हवेच्या झोतामध्ये काम करावे लागले किंवा तीव्र उष्णतेच्या संपर्कात जसे वेल्डिंग, भट्ट्या, ओतकाम आल्यास शरीराचे तापमान नियंत्रित करणारी हायपोथॅलॅमसमधील यंत्रणा कोलमडून पडते आणि उष्माघात होतो.

उष्माघात होण्याचे नेमके कारण म्हणजे शरीरातून बाहेर पडणारुया उष्णतेहून शोषलेली उष्णता अधिक असते. यामुळे शरीराचे तापमान वाढते. उष्माघात झाल्यानंतर तातडीची वैद्यकीय सेवा मिळाली नाहीतर मृत्यू ओढवतो. उष्माघात आणि ताप येणे या भिन्न प्रक्रिया आहेत. ताप येण्यामध्ये शरीराचे तापमान नेहमीहून अधिक राहते. व्याख्येप्रमाणे उष्माघात म्हणजे शरीराचे तापमान 38.1 पेक्षा (100-101फॅ.) अधिक किंवा त्याहून अधिक स्थिर राहणे. सामान्य पणे दुपारी शरीराचे तापमान 37.70 से (97.5ते 98 फॅ) असते. उष्माघातामध्ये हे तापमान 400 से होणे हे जीवघेणे ठरते.

उन्हापासून बचाव होण्यासाठी

वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावीत किंवा ही कामे सकाळी लवकर अथवा सायंकाळी कमी तापमानात करावी. 
काळ्या व भडक रंगाचे कपडे उष्णता शोशून घेणार असल्याने त्यांचा वापर टाळून सैल पांढर्‍या रंगाचे कपडे वापरावेत. 
पाणी भरपूर प्रमाणात प्यावे, शरबत प्यावे तसेच उन्हामध्ये बाहेर जाताना गॉगल, टोपी, टॉवले, फेटा, उपरणे यांचा वापर करावा. 
उष्माघाताची लक्षणे आढळल्यास तत्काळ काम थांबवून उपचार सुरू करावा. 

शहरातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने उष्माघाताचा प्रादुर्भाव होऊन जीवित हानी होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाय करून काळजी घ्यावी असे आवाहन नगरपालिका, आरोग्य विभाग, यांच्यावतीने करण्यात आले आहे.