होमपेज › Marathwada › शिक्षकांचा सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार

शिक्षकांचा सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार

Last Updated: Jan 20 2020 3:10PM

संग्रहित छायाचित्रनांदेड : प्रतिनिधी

देशभरात निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणाची चर्चा सुरू असताना, तसेच अशा अत्याचारांबाबत जनजागृतीही सुरू असताना नांदेडमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडल्याचे उघड झाले. बिलोली तालुक्यातील ४ शिक्षकांनी गुरू-शिष्य परंपरेला काळीमा फासत सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केला आहे. पीडितेची प्रकृती गंभीर असून ती मृत्यूशी झुंज देत आहे. याप्रकरणी रामतीर्थ पोलिस ठाण्यात या चार नराधमांविरुद्ध पॉक्सो कायदा, तसेच कलम ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

►बीड : सासरच्या जाचास कंटाळून विवाहितेची आत्महत्या

पीडित विद्यार्थिनी साईबाबा विद्यालयात शिकते. हे विद्यालय नांदेड जिल्ह्याच्या मुख्यालयापासून ५० किमीच्या अंतरावर आहे. या चार शिक्षकांनी सामूहिक बलात्कार करत असताना पीडित विद्यार्थिनीला अश्लिल व्हिडिओ देखील दाखवला. घडलेल्या सारा प्रकार या पीडितेने आपल्या कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर विद्यालय परिसरात खळबळ उडाली. या अत्याचारानंतर पीडितेला उपचारासाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

►बीड : टीईटी परीक्षेत गोंधळ; उत्तराचे पर्याय गायब

पाच जणांवर गुन्हा दाखल

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी पीडित विद्यार्थिनीच्या पालकांशी संपर्क साधून त्यांना विश्वासात घेतले. त्यानंतर हा गुन्हा दाखल झाला. सय्यद रसुल, दयानंद राजुरे, प्रदीप पाटील, आणि घनंजय शेळके अशी या अत्याचार करणाऱ्या शिक्षकांची नावे आहेत. त्यांच्यासह त्यांना साथ देणारी महिला कर्मचारी सुरेखा बनसोडे हिच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर हे चारही शिक्षक आणि महिला कर्मचारी फरार झाले आहेत.