Wed, Jul 24, 2019 12:07होमपेज › Marathwada › शिक्षकांनी उचलला गाव स्वच्छतेचा विडा 

शिक्षकांनी उचलला गाव स्वच्छतेचा विडा 

Published On: Feb 11 2018 12:55AM | Last Updated: Feb 11 2018 12:31AMजालना : प्रतिनिधी

घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथील सरस्वती भुवन प्रशालेच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी गाव स्वच्छतेचा विडा उचलला आहे.

विद्यार्थी व शिक्षकांनी स्वच्छ भारत मिशन व परिसर स्वच्छता आणि स्वच्छतेचे महत्त्व या उपक्रमांतर्गत विशेष मोहीम राबविली. प्रथम  रेल्वेस्टेशनचा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. यात रेल्वे कर्मचारी सहभागी झाले होते. स्टेशन मास्टर  यादव, विकास काळे, मीना यावेळी उपस्थित होते. प्राथमिक आरोग्य केंद्रातसुद्धा स्वच्छ परिसर व आपले आरोग्य या संकल्पनेतून आरोग्य कर्मचार्‍यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांनी दवाखान्याचा परिसर स्वच्छ केला. यावेळी वैद्यकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमात प्रशालेचे मुख्याध्यापक रमेश दडमल यांच्या मार्गदर्शनाखाली व्ही. के. पाटील विष्णू पाटील, कपिल दहेकर,  संतोष खरात, सचिन भुतेकर, नानासाहेब देशमुख, आत्माराम घानमोडे आदी सहभागी झाले होते.