होमपेज › Marathwada › तुळजापूरचा लाचखोर तलाठी जेरबंद

तुळजापूरचा लाचखोर तलाठी जेरबंद

Published On: Jan 05 2018 7:18PM | Last Updated: Jan 05 2018 7:18PM

बुकमार्क करा
उस्मानाबाद : प्रतिनिधी

खरेदी केलेल्या प्लॉटची नोंद घेऊन तसा सातबारा देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेणारा तुळजापूरचा तलाठी जेरबंद झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज दुपारी ही कारवाई केली. प्रकाश यशवंत पवार (वय ५०) असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. 

तलाठी पवार याने तक्रारदाराच्या बहिणीकडे प्लॉटची नोंद घेऊन सातबारा देण्यासाठी २० हजार रुपये खासगी लेखनिक शंकर गणपती सुतार (वय ७०, रा. काक्रंबा, ता. तुळजापूर) याच्यामार्फत मागितली. दरम्यानच्या काळात तक्रारदाराने लाचलुचपतकडे तक्रार दिली. त्यानंतर आज सापळा रचून खासगी लेखनिक सुतार याच्यामार्फत लाच स्वीकारल्यानंतर तलाठी पवार, लेखनीक सुतार या दोघांनाही अटक केली. हा सापळा तलाठी कार्यालयातच लावण्यात आला होता. पोलिस उपअधीक्षक बी. व्ही. गावडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.