होमपेज › Marathwada › ताडकळस येथे राष्ट्रवादीच्या सुशीलाबाई आंबोरे विजयी

ताडकळस येथे राष्ट्रवादीच्या सुशीलाबाई आंबोरे विजयी

Published On: Mar 01 2018 1:34AM | Last Updated: Feb 28 2018 11:56PMताडकळस  : प्रतिनिधी

येथील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला आपली जागा कायम ठेवण्यास यश आले. या जागेवर पूर्वी राकाँचे तालुकाध्यक्ष गजानन आंबोरे याच्या मातोश्री विजयी झाल्या होत्या; पण जि. प.निवडणुकीमध्ये त्या विजयी झाल्यानंतर या पदाचा राजीनामा दिल्यामुळे  प्रभाग क्र. 3 मधील एक जागा रिक्त होती. या जागेसाठी  झालेल्या निवडणुकीत राकाँच्याच सुशीलाबाई आंबोरे या 428 मते घेऊन विजयी झाल्या आहेत. ही जागा शिवसेना व कौंग्रेस आय या युतीने प्रतिष्ठेची करून कोणत्याही परिस्थितीत साम, दाम, दंडाचा, वापर करून आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला होता. या निवडणुकीत ताडकळसमध्ये सर्व राजकीय पक्षाचे पुढारी गजानन आंबोरे यांच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी युती करून एकत्र आले होते.

या निकालात शिवसेना,काँग्रेस युतीच्या रजियाबी  पठाण यांना 328 मते मिळाली आहेत तर अपक्ष उमेदवार सुलोचना कदम यांना 12 मते तर नोटाला 12 मते पडली. मतमोजणीची प्रक्रिया ही पूर्णा तहसील कार्यालयात घेण्यात आली. अटीतटीच्या समजल्या जाणार्‍या निवडणुकीत अखेर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा विजय झाला. सार्वत्रिक निवडणुकीतही ताडकळसच्या मतदारांनी राकाँला एकूण 15 जागांपैकी 7 जागेवर विजय मिळवून दिला होता. यात शिवसेना 5, काँग्रेस आय 3 जागेवर होते.