Sat, Jul 20, 2019 15:42होमपेज › Marathwada › अजूनही 6 टक्के लोकांच्या हाती लोटाच!    

 अजूनही 6 टक्के लोकांच्या हाती लोटाच!    

Published On: Mar 04 2018 1:41AM | Last Updated: Mar 04 2018 1:14AMपरभणी : नरहरी चौधरी

जिल्ह्याला स्वच्छ भारत मिशनअंतर्गत मिळालेल्या उद्दिष्टाची अजूनही पूर्तता करता आली नाही. 28 फेबु्रवारी अखेरपर्यंत जिल्हाभरात केवळ उद्दिष्टापैकी 94 टक्के शौचालयांची कामे पूर्ण झाली असून अजूनही 6 टक्के लोकांच्या हाती लोटा आहे. यात 9 तालुक्यांपैकी केवळ तीन तालुके पाणंदमुक्‍त झाले. परभणी व जिंतूर तालुका हा उद्दिष्टापासून 13 टक्के दूर आहे.

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नऊ तालुके 2 ऑक्टोबरपर्यंत पाणंदमुक्‍त होणे अपेक्षित होते.जिल्ह्यात 1 लाख 86 हजार 168 कुुटुंबांनी वैयक्‍तिक शौचालयांची बांधकामे केली. अजूनही 14 हजार 35 कुुटुंबांतील नागरिक उघड्यावर लोटा घेऊन शौचासाठी जात असल्याचे  प्रशासनाच्या अहवालावरून स्पष्ट होते. यापूर्वी वैयक्‍तिक शौचालय बांधकामासाठी लाभधारकांना 12 हजारांचे अनुदान काम पूर्ण झाल्यानंतर देण्यात येत होते, पण आता त्यात बदल झाला असून  शौचालय बांधकामातच 5 हजार रुपयांचे साहित्य आणि नंतर 7 हजार रुपयांची रक्‍कम खात्यात जमा करण्यात येत आहे, पण यामध्ये एक वर्षाचा कालावधी ओलांडला तरी हजारो लाभधारकांना त्यांचे अनुदान मिळाले नसल्याची ओरड जिल्हाभरातून होत आहे. परभणी जिल्हा हा शंभर टक्के पाणंदमुक्‍तीपासून केवळ 6 टक्के दूर आहे. आजही अनेक नागरिक हे भाडेतत्त्वावरील शौचालयांचा वापर करीत आहे. अशा नागरिकांनी घरी वैयक्‍तिक शौचालयांचे बांधकाम करून त्याचा नियमित वापर करावा  असे उपमुख्य कार्यकारी अधिकारीचंद्रहार ढोकणे यांनी सांगितले.