Sat, Sep 22, 2018 22:18होमपेज › Marathwada › उन्हाचा पारा 36.4 अंशांवर

उन्हाचा पारा 36.4 अंशांवर

Published On: Feb 24 2018 1:14AM | Last Updated: Feb 23 2018 11:41PMबीड : प्रतिनिधी

होळीचा सण येण्यापूर्वी जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढत चालला आहे. गुलाबी थंडी आता गेली असून, बीडकरांमध्ये रात्री थंडी तर दिवसा कडक ऊन असे वातावरण मागच्या आठवड्यापासून अनुभवास येत आहे. जिल्ह्याच्या तापमानात वाढ झाली असून, मागच्या आठवड्यापासून तापमान 33 अंश सेल्सिअसच्या पुढेच आहे, तर शुक्रवारी बीड शहराचे कमाल तापमान 36.4 अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

वाढत्या गरमीमुळे  तोंडाला रुमाल आणि डोक्यावर टोपी लावूनच नागरिक घराबाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे. दुपारच्या वेळी ग्रामीण आणि शहरी भागात रस्ते निर्मनुष्य होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. मार्च महिन्यात उन्हाचा पारा चढत असतो, मात्र बीडमध्ये फेब्रुवारीतच पारा 36 अंश सेल्सिअसवर आहे. 

बीड जिल्ह्यातील दरवर्षी एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत कडाक्याचे ऊन पडते. मागच्या वर्षी  एप्रिल महिन्यात बीडचे तापमान सर्वाधिक 47 अंश सेल्सिअसची नोंद झाली होती. यंदा पाऊस काळ जिल्ह्यात चांगला झाला होता, त्यामुळे थंडीही वाढली होती. आता ढोबळ मानाने सांगायचे तर महाशिवरात्रीनंतर थंडी कमी झाली आहे. आता तर वाढत्या उकाड्याने नागरिक घामाघूम होताना दिसू लागले आहेत. दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य होऊ लागले आहेत. गरमीपासून संरक्षण देणारे सन गॉगल्स, टोपी, गमजे, स्कार्प इत्यादी साहित्य बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे.