Tue, Apr 23, 2019 22:41होमपेज › Marathwada › अंगणवाडी कार्यकर्तीची गळफास घेऊन आत्महत्या

अंगणवाडी कार्यकर्तीची गळफास घेऊन आत्महत्या

Published On: Jun 10 2018 1:48AM | Last Updated: Jun 10 2018 12:16AMगेवराई : प्रतिनिधी

मागील सहा महिन्यांपासून अंगणवाडी कार्यकर्ती नीता भागवत शिंदे यांना मानधन न मिळाल्याने त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला होता. यातून त्यांनी अंगणवाडी केंद्रातील लोखंडी अँगलला गळफास घेऊन शनिवारी (दि.9) दुपारी आत्महत्या केली.

गेवराई तालुक्यातील गुंतेगाव येथील अंगणवाडी केंद्र क्र.1 येथे अंगणवाडी कार्यकर्ती म्हणून नीता भागवत शिंदे या कार्यरत होत्या. पतीच्या निधनानंतरत त्यांना अंगणवाडी कार्यकर्ती म्हणून मिळणारे मानधन हे एकमेव उदरनिर्वाहासाठीचे साधन होते. मुलबाळ नसल्याने वयोवृद्ध वडिलांकडे त्या राहत होत्या. अतिशय तुटपुंज्या मानधनामध्ये त्यांचा दरनिर्वाह सुरू होता. 

प्रशासनातील दप्तरदिरंगाईमुळे मागील आठ महिन्यांपासून अंगणवाडी कार्यकर्तींना मिळणारे मानधन निधी अभावी बंद होते. घरात आणि आसपास कोणी नसताना शनिवारी अंगणवाडी केंद्रातील लोखंडी अँगलला ओढणीने त्यांनी गळफास घेतला. उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यात आले.