Tue, Mar 19, 2019 09:20होमपेज › Marathwada › बीड : आत्‍महत्या केलेल्या शेतकर्‍याच्या आस्‍थीची  विटंबना

बीड : आत्‍महत्या केलेल्या शेतकर्‍याच्या आस्‍थीची  विटंबना

Published On: Mar 11 2018 11:10AM | Last Updated: Mar 11 2018 11:10AMमाजलगाव : प्रतिनिधी

दोन दिवसापुर्वी पाञुड येथील विलास काळे या शेतकर्‍याने कर्जास कंटाळून आत्महात्या केली होती. यानंतर पाञुड येथे अंत्यविधी केलेल्या ठिकाणची आस्थी सावडण्यासाठी  गेलेल्या नातेवाईकांना मृत शेतकऱ्यांची दहन केलेली जागाच रस्त्याचे काम करणाऱ्या कंपणीच्या टिपने बुजवुन टाकल्याने आस्थीविसर्जन कसे करावे आसा प्रश्न नातेवाईकांना पडल्याने शेतकरी संतप्‍त झाले. या  तणावग्रस्त परिस्‍थिती निर्माण होत असतांना गावकर्‍यांनी जेसीबी मशिनने अलगद मुरुम बाजुला करून आस्थी मोकळ्या करण्यात आल्या आहेत.

गेल्या दोन दिवसापूर्वी पाञुड येथील विलास काळे (वय ३२) या शेतकऱ्यांनी कर्जास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर पाञुड येथील स्मशानभूमीत त्‍यांच्यावर अंत्‍यसंस्कार करण्यात आले. आज दि.११रोजी आस्थी विसर्जन करण्याचा कार्यक्रम होता. यावेळी नातेवाईक स्मशानभुमीत गेले असता अंत्यविधी केलेल्या जागेवर सध्या पंढरपूर-खामगाव वारी मार्गाचे काम करणाऱ्या दिलीप बिडकान कंपणीच्या टिपरने रोडवरील अतिरिक्त मुरुम या स्मशानभुमीत टाकल्याने मृत शेतकऱ्याची अंत्‍यसंस्‍कार केलेली जागाच गाडून टाकण्यात आली. यावेळी उपस्‍थित असलेल्या नातेवाईंकांना आस्थीविसर्जन कसे करावे हा प्रश्न पडला. या कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आस्थीची विटंबना केल्याने नागरिक संतप्‍त झाले, परिस्‍थिती तणावपूर्ण असतानाही संबधित कंपनीचे अधिकारी, पोलिस व महसूल प्रशासनाकडून त्या ठिकाणी कुणीच आले नसल्याने तणावग्रस्त परिस्‍थिती निर्माण होत आहे.

सध्या आस्थीविसर्जन कसे करावे हा प्रश्न नातेवाईकांना पडला असताना गावकरी यांनी जेसीबी मशीनने अंत्यविधी केलेल्या जागेवरील अलगद मुरुम सारुन मृत शेतकरी विलास काळे यांच्या आस्थी उघड करुन आस्थीविसर्जन करण्यासाठी रक्षा सावडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.