Fri, Nov 16, 2018 09:40होमपेज › Marathwada › पाच एकरावरील ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी

पाच एकरावरील ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी

Published On: Feb 11 2018 12:55AM | Last Updated: Feb 11 2018 12:44AMवडीगोद्री : प्रतिनिधी 

अंबड तालुक्यातील गंधारी शिवारातील 5 एकर ऊस जळाला. भाऊसाहेब जोगदंड व बाबू जमिरोद्दीन या शेतकर्‍यांचा हा ऊस होता. दरम्यान, परिसरात आतापर्यंत 28 एकर ऊस जळाला आहे.
गंधारी शिवारातील गट नं. 18 मध्ये भाऊसाहेब जोगदंड व बाबू जमिरोद्दीन पटेल (रा. शहागड) यांच्या प्रत्येकी एक एकर उसाला भाऊसाहेब जोंगदड यांच्या शेतात  मध्यभागी असलेल्या वीज तारांच्या घर्षणामुळे आग लागली. 

यापूर्वी गट नं. 19 मधील शहादेव खराद अप्पासाहेब रामराव खराद, अशोक रामराव खराद यांचा तीन एकर ऊस जळून खाक झाला. वडीगोद्री व शहागड परिसरात गेल्या तीन महिन्यांत शॉर्टसर्किटमुळे 28 एकर उसाला आग लागल्याची घटना घडली. त्यात 8 नोव्हेंबर 2017 रोजी वडीगोद्री शिवारातील गट क्र.  52 मधील 5 एकर, 18 नोव्हेंबर रोजी गट नंबर 114 व 164 मधील 9 एकर ऊस, 10 डिसेंबर रोजी महाकाळा शिवारातील गट नं. 72 मधील एकर ऊस जळूल खाक झाला. एवढ्या मोठ्यया प्रमाणावर ऊस जळत असल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. या वर्षी परिसरात अतिरिक्त झालेला ऊस साखर कारखाने नेण्यात उशीर करीत असल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे.