Thu, Nov 22, 2018 01:28होमपेज › Marathwada › ऊस तोडणी कामगाराचा संशयास्‍पद मृत्यू

ऊस तोडणी कामगाराचा संशयास्‍पद मृत्यू

Published On: Jan 26 2018 11:05AM | Last Updated: Jan 26 2018 11:05AMनांदगाव : प्रतिनिधी

चाळीसगाव तालुक्यातील सुनील धर्मा केदार (वय ३५, रा. कर्मुन ता. चाळीसगाव) हा ऊस तोडणी कामगार नांदगाव, जळगाव खुर्द शिवारात ऊस तोडणीस आला होता. केदार यांचा मृतदेह दि. २५ रोजी सायंकाळी संशयीतरित्या पोलिसांना आढळून आला. 

या प्रकरणी नांदगाव पोलिसांनी मृताचा भाचा व अन्य एकास ताब्यात घेतले आहे. घटनेतील मृताचा खून असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मृताच्या छातीच्या डाव्याबाजुला हत्याराने वार केला असून मोठ्या प्रमाणात रक्‍तस्‍त्राव झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. 

मृत केदार यांच्यासमवेत पत्‍नी, चार मुली सोबत होत्या. याप्रकरणी नांदगाव पोलिस तपास करीत असून संशयितांना ताब्यात घेतले आहे.