Sun, Jul 05, 2020 04:07होमपेज › Marathwada › लातुरच्या जिल्हा परिषदेत विद्यार्थ्यांची गांधीगिरी ...

लातुरच्या जिल्हा परिषदेत विद्यार्थ्यांची गांधीगिरी ...

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

प्रतिनिधी : लातूर

शाळेला मुख्याध्यापक द्या, अशी मागणी करीत उदगीर तालुक्यातील गुडसूर येथील जिल्हा परिषद शाळेतील काही विद्यार्थ्यांनी जील्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोरील व्हरांड्यात गुरुवारी ठाण मांडले.

रुजू होतानाच हा प्रकार घडल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी काहींशे गोंधळून गेले. यापूर्वीचे सीईओ माणिक गुरसळ यांची नागपुरला बदली झाली असून, लातुरचे सीईओ म्हणून डॉ. विपीन इटनकर यांनी गुरुवारी पदभार स्विकारला. ते कार्यालयात बसले असताना काही विद्यार्थी तेथील व्हराड्यात आले व त्यानी आम्हाला मुख्याध्यापक द्या, अशी घोषणाबाजी सुरू केली. त्याची चौकशी केली असता, गुडूसूर येथील शाळेत एक हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. तेथील मुख्याध्यापकांचा अचानक पदभार काढून घेतल्याने शालेय व्यवस्थापन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे शाळेतील कामकाजात अडचणी येत आहेत. म्हणून विद्यार्ध्यांनी ही गांधीगिरी केल्याचे कळले. मात्र या आंदोलनात मोजकेच विद्यार्थी सहभागी झाल्याने याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू होती.