Thu, Jan 24, 2019 14:39होमपेज › Marathwada › हिंगोलीत बारावीच्या विद्यार्थिनीची आत्‍महत्‍या

हिंगोलीत बारावीच्या विद्यार्थिनीची आत्‍महत्‍या

Published On: Feb 27 2018 12:36PM | Last Updated: Feb 27 2018 12:36PMहिंगोली : प्रतिनिधी

बारावीच्या परीक्षेत नापास होण्याच्या भितीने चिंतेत असलेल्या हिंगोली शहरातील एनटीसी भागात राहणार्‍या सतरा वर्षीय विद्यार्थीनीने आपल्या राहत्या घराच्या तिसर्‍या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना दि. २७ फेब्रुवारी रोजी सकाळी घडली. परीक्षेच्या सुमारास ती आजारी पडल्याने ती चिंतेत होती.

एनटीसी भागात राहणार्‍या मुळचे नर्सी नामदेव येथील रामलिंग किर्तनकार यांची मुलगी सोनाली ही हिंगोली शहरातील सरजूदेवी कनिष्ठ महाविद्यालयात कॉमर्स शाखेत शिक्षण घेत होती. २१ फेबु्रवारीपासून तिच्या परीक्षा सुरू झाल्या होत्या. परीक्षा दरम्यान आजारी असल्याने तिचे पेपर अवघड जात होते. सोमवारी बारावीचा तिसरा पेपर देवून ती घरी आल्यानंतर ती कुणाशीही न बोलता चिंतेत होती. पेपर दिल्यापासून निराश झाल्याने मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास परीक्षेत नापास होण्याच्या भितीतून एनटीसी भागात अपार्टमेंटच्या तिसर्‍या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.