Thu, Apr 25, 2019 07:36होमपेज › Marathwada › मराठा क्रांती मोर्चाची उद्या लातुरात राज्यस्तरीय बैठक

मराठा क्रांती मोर्चाची उद्या लातुरात राज्यस्तरीय बैठक

Published On: Jul 28 2018 4:19PM | Last Updated: Jul 28 2018 4:19PMलातूर : प्रतिनिधी

लातूर जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रविवार (दि.२९) रोजी मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बार्शी रोड पीव्हीआर थिएटरच्या पाठीमागे असलेल्या राहीचंद्र मंगल कार्यालयात सकाळी ११ वाजता ही बैठक होणार असून राज्यातील विविध जिल्ह्यातील समन्वयक व मराठा समाजाच्या विविध संघटनांचे पदाधिकारी या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. 

राज्यभर सुरू असलेले आंदोलन, मराठा आरक्षण, शैक्षणिक सवलती, मराठा मुलांचे वस्तीगृहाबद्दल सरकारने घेतलेली भूमिका तसेच अन्य मागण्यांबाबत या बैठकीत सविस्‍तर विचारमंधन होणार आहे. आंदोलनाची पुढील दिशाही ठरविण्यात येणार आहे. बैठकीनंतर समन्वयक पत्रकारांशी संवाद साधणार असल्याचे मराठा क्रांती लातूरच्या वतीने सांगण्यात आले.