Mon, Jun 17, 2019 02:31होमपेज › Marathwada › गोपीनाथ मुंडेंचा सरकारने अवमान केलाः धनंजय मुंडे

गोपीनाथ मुंडेंचा सरकारने अवमान केलाः धनंजय मुंडे

Published On: Jan 10 2018 6:43PM | Last Updated: Jan 10 2018 7:33PM

बुकमार्क करा
परळी : प्रतिनिधी

गोपीनाथराव मुंडे ऊस तोडणी कामगार कल्याणकारी महामंडळाची सरकारने घोषणा करून 3 वर्ष झाली अद्याप एकाही कामगाराला मदत नाही. महामंडळ ही नाही आणि कार्यालयही नाही अशी स्थिती आहे. यात गोपीनाथराव मुंडे यांचा अवमान भाजप सरकारने केल्याचा आरोप विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. या महामंडळास विलंब झाला, आणखी कार्यालय नाही, एकालाही लाभ मिळाला नाही हे मान्य करण्यात मंत्री महोदयांना भाग पाडले असे ते म्हणाले. 

हे कार्यालय एका महिन्याच्या आत सुरू करण्याचे आश्वासनही मंत्री संभाजी पाटील यांनी दिले. ऊस तोडणी कामगारांसाठी गोपीनाथ मुंडे नावाने भाजपने महामंडळ जाहीर केले होते. तेव्हा आम्ही सरकारचे अभिनंदन केले होते. पण तीन वर्षांपासून महामंडळाचे काम सुरू झालेले नाही. कार्यालय, कर्मचारी, लाभार्थी अशी काहीच तरतूद नाही. ज्या दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांनी भाजपला वाडी वस्तीत नेले, त्याच गोपीनाथ मुंडे यांची उपेक्षा भाजपने चालवली आहे. असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला.