गायिका गिता माळी यांचा कार अपघातात मृत्‍यू 

Last Updated: Nov 15 2019 9:00AM
Responsive image


बीड : प्रतिनिधी 

माजलगावचे तत्कालीन तहसिलदार व सध्या सुधीर मुनगंटीवार यांचे विशेष कार्यकारी अधिकारी महेश शेवाळे यांच्या भगिनी प्रख्यात गायिका गिता माळी यांचा अपघातात दुर्देवी मृत्‍यू झाला. अमेरिकेतील कार्यक्रम आटोपून मुंबई विमानतळावरून नाशिककडे जात असताना त्‍यांच्या कारला शहापूरजवळ गुरूवार सकाळी अपघात झाला. त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचे पती अॅडव्होकेट विजय माळीही जखमी झाले असून त्‍यांची प्रकृतीही गंभीर आहे.

मुंबई - नाशिक महामार्गावरील शहापूर शिवारात, एकता हॉटेलसमोर माळी यांच्या कारला टँकरची धडक बसली. गीता माळी यांच्यासोबत त्यांचे पती विजय माळीसुद्धा या अपघातात जखमी झाले असून, त्‍यांना शहापूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गीता माळी या गेल्या दोन महिन्यांपासून अमेरिकेत गायनाचे कार्यक्रम करीत होत्या. गुरूवारी सकाळीच त्या मायदेशी परतल्या होत्या. एअरपोर्टहून नाशिकला परतत असताना महामार्गावर हा अपघात झाला. गीता माळी यांचे गायनाचे देश विदेशात अनेक कार्यक्रम झाले आहेत. त्यांच्या अपघाती निधनाने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.