Mon, Nov 19, 2018 23:13होमपेज › Marathwada › लातूर : ज्येष्ठ सत्यशोधकी डॉ. श्रीराम गुंदेकर यांचे निधन

लातूर : ज्येष्ठ सत्यशोधकी डॉ. श्रीराम गुंदेकर यांचे निधन

Published On: Jan 12 2018 10:27AM | Last Updated: Jan 12 2018 10:27AM

बुकमार्क करा
लातूर : प्रितिनिधी 

लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयातील माजी प्रोफेसर डॉ. श्रीराम गुंदेकर यांचे आज सकाळी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते महाराष्ट्रातील ज्येष्ठ सत्यशोधक चळवळीचे संशोधक आणि अभ्यासक होते. 

महात्मा फुलेंच्या कार्याविषयी गुणदेकरांचा चांगला अभ्यास होता. फुलेंच्या सत्यशोधक समाजाच्या इतिहासावर त्यांनी चार खंड लिहीले होते. गुणदेकरांनी संपूर्ण आयुष्य सत्यशोधकी विचाराच्या प्रचार, प्रसारात घालवले. त्यांनी नव्या पिढीसमोर संशोधन साहित्याचा आदर्श घालून दिला होता.