Tue, Apr 23, 2019 00:26होमपेज › Marathwada › शिवसेनेचे शेतकर्‍यांसोबत तहसीलसमोर ठिय्या 

शिवसेनेचे शेतकर्‍यांसोबत तहसीलसमोर ठिय्या 

Published On: Feb 16 2018 2:30AM | Last Updated: Feb 16 2018 1:45AMगेवराई : प्रतिनिधी 

दुष्काळाचे चटके सहन केलेल्या शेतकर्‍यांना कापसावर पडलेल्या बोंडअळी आणि आता गारपीट झाल्याने आणखीनच आर्थिक खाईत लोटले आहे. त्यामुळे सरकारने केवळ घोषणा आणि ऑनलाईनचा घोळ घालून चालणार नाही तर, तात्काळ पिकांचे पंचनामे करून गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करत शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी शेतकर्‍यांसह तहसिल कार्यालया समोर धरणे आंदोलन करून ठिय्या मांडला.

गेवराई तालुक्यासह बीड जिल्ह्यातील विविध भागात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली होती. यात पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या शेतकर्‍यांना शासनाने तात्काळ आर्थिक मदत करावी या मागणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने, गुरुवारी  गेवराई तहसिल समोर माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी व शिवसैनिकांनी धरणे आंदोलन करून ठिय्या मांडला. यासंदर्भात तहसीलदारांना शिवसैनिकांनी निवेदनही दिले. 

आंदोलनात पं.स. उपसभापती भीष्मांचार्य दाभाडे, जि. प. सदस्य बाबुराव जाधव, बालासाहेब पाणखडे, आजमखान पठाण, दिनकर शिंदे, सुभाषराव शिंदे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.