Thu, Nov 15, 2018 18:00होमपेज › Marathwada › बत्तीस मण सुवर्ण सिंहासनास निधी देणार 

बत्तीस मण सुवर्ण सिंहासनास निधी देणार 

Published On: Feb 21 2018 1:20AM | Last Updated: Feb 21 2018 1:00AMपरळी : प्रतिनिधी

जगदंब प्रतिष्ठान आयोजित सार्वजनिक शिवजन्मोत्सवच्या वतीने मिरवणुकीचा खर्च टाळून रायगडावर साकार होत असलेल्या बत्तीस मण सुवर्ण सिंहासनासाठी निधी देण्यात येणार आहे. 
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जगदंब सार्वजनिक शिव जन्मोत्सवच्या वतीने गंगासागर नगर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून परळी नगर परिषदेचे शिक्षणसभापती गोपाळ आंधळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून व्यकंटेश शिंदे, प्रमुख पाहुणे म्हणून स्वच्छता सभापती विजय भोयटे, दिनेश गजमल, अनंत इंगळे, केशव साबळे उपस्थित होते.

जगदंब सार्वजनिक शिवजन्मोत्सव कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते शिवपूजन करून सुरुवात करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचा हार, श्राल, श्रीफ ळ देऊन सत्कार करण्यात आला व गंगासागर नगर मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  रायगडावर साकार होत असलेला बत्तीस मण सुवर्ण सिंहासनासाठी निधी देण्याची घोषणा करण्यात आली.  

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जगदंब सार्वजनिक शिवजन्मोत्सवचे बळीराम नागरगोजे, मोहन राजमाने, संतोष चौधरी, दिनेश कांबळे, गोविंद जंगले, अशोक हिंगणे, शंकर बुंदिले, केशव जाधव, पप्पू पौळ, केतन जाधव, संतोष मस्के, गजानन थळकरी, गोविंद गरड, विशाल आवाड, दीपक खाडे, सुशिल बारक्के, बालाजी शिंदे, अजय सुरवसे, श्याम निलेवाड, जगन्नाथ कदम,  निखील केंद्रे, बालाजी डांगे, गणेश शिंदे, कृष्णा भाग्यवंत, विलास खरोळकर, राम चव्हाण, अजित क्षीरसागर, संजय लोखंडे आदींनी परिश्रम घेतले.