Wed, Nov 14, 2018 09:01होमपेज › Marathwada › लातूर : शिवरायांची रांगोळी अडीच एकरात(व्‍हिडिओ)

लातूर : शिवरायांची रांगोळी अडीच एकरात (व्‍हिडिओ)

Published On: Feb 16 2018 2:52PM | Last Updated: Feb 16 2018 2:52PMलातूर : प्रतिनिधी

शिवजयंतीनिमित्त येथील क्रीडा संकुलाच्या भव्य मैदानावर अडीच एकरात शिवारायांची  सिंहसनाधिष्टीत  भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे. त्याची पाहणी व उद्‌घाटन पालकमंत्री संभाजीराव पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.

मंगेश निपाणीकर या कलाकाराने ही रांगोळी साकारली आहे, यासाठी ५० हजार किलो विविध रंगीत रांगोळी वापरण्यात आली आहे. ही रांगोळी जगातील सर्वात मोठी रांगोळी असल्याचा दावा कलाकाराने केला असून गिनीजच्या तज्ञांकडून त्याची पाहणी होणार आहे. शुक्रवारी सकाळी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी या रांगोळीची पाहणी केली. यावेळी यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, ॲड. वैशाली यादव, कलाकार मंगेश निपणीकर व भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.