Tue, May 21, 2019 18:28होमपेज › Marathwada › तुरीच्या पैशासाठी लातुरात अधिकाऱ्यांना डांबले

तुरीच्या पैशासाठी लातुरात अधिकाऱ्यांना डांबले

Published On: Apr 09 2018 4:07PM | Last Updated: Apr 09 2018 4:07PMप्रतिनिधी : लातूर

शेतकऱ्यांच्या खरेदी केलेल्या तुरीचे पैसै ७२ तासाच्या आत द्यावेत व हरभरा खरेदी केंद्र सुरू करावीत , या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी लातूर येथील मार्केटींग फेडरेशनच्या कार्यालयाला टाळे ठोकले. यामुळे सुमारे दीड तास अधिकारी व कर्माचारी कार्यालयातच कोंडून राहिले.

लातूर जिल्ह्यातील ३६ हजार शेतकऱ्यांनी तुरी विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी अकरा हजार शेतकऱ्यांची तूर शासनाने खरेदी केली. खरेदी केलेल्या तुरीची रक्कम ६६ कोटी झाली असून त्यापैकी केवळ चार कोटी रुपयेच खात्यावर टाकण्यात आले आहेत. ६२ कोटी रुपये सरकारकडेच थकले आहेत. तूर विकल्यानंतर ७२ तासात ही रक्कम संबधीत शेतकऱ्यास मिळणे बंधनकारक आहे.

सध्या लग्नसराई व अन्य कामांसाठी शेतकऱ्यांना पैशाची अत्यंत गरज आहे. त्यामुळे ते द्यावेत यासाठी शेतकरी संघटनेने वेळोवेळी निवेदने दिली होती. तसेच आंदोलनाचे इळारेही दिले होते. परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्याने संतापलेल्या पदाधिकाऱ्यांनी हे आंदोलन केले.