Tue, Mar 26, 2019 22:21होमपेज › Marathwada › शरद पवार यांची मुख्यमंत्री यांच्या फेसबुक पेजवरुन बदनामी

शरद पवार यांची मुख्यमंत्री यांच्या फेसबुक पेजवरुन बदनामी

Published On: Jan 08 2018 7:07PM | Last Updated: Jan 08 2018 7:07PM

बुकमार्क करा
शिरूर: प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी मुख्यमंत्री यांच्या देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र या फेसबुक पेजवरुन बदनामीकारक मजकूर प्रकाशीत करण्यात आला आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मेहबूब शेख यांच्या तक्रारीवरुन शिरूर पोलिसात आज दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या एक महिन्यांपासून ते कालपर्यंत वेळोवेळी देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र या फेसबुक पेजवरुन शरद पवार यांच्या नावावर बदनामीकारक मजकूर प्रसारीत करण्यात आला. यामुळे नागरिकांच्या, कार्यकर्त्यांच्या आणि पक्षाच्या भावना दुखावल्या असल्याने तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.