Wed, Mar 27, 2019 01:56होमपेज › Marathwada › क्लीपवरून शांतीवनमध्ये गोंधळ

क्लीपवरून शांतीवनमध्ये गोंधळ

Published On: Mar 20 2018 1:47AM | Last Updated: Mar 20 2018 1:47AMबीड : प्रतिनिधी

शिरूर कासार तालुक्यातील शांतीवन येथील प्रकल्पातील मुलांना मारहाण झाल्याची क्‍लीप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या क्‍लीपवरून रविवारी रात्री शांतीवनमध्ये गोंधळ झाला. गावातीलच चौघांनी प्रकल्पात धुडगूस घालत तलवार, कुकरीने हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला. हल्‍ला करणारे तिघे पळून जाण्यात यशस्वी झाले तर एकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याचा जबाब संचालक दीपक नागरगोजे यांनी शिरूर पोलिसांना सोमवारी दिला. 

शिरुर तालुक्यातील आर्वी येथे कावेरी व दीपक नागरगोजे हे शांतीवन प्रकल्प चालवितात. मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर शांतीवनमधील मुलांना अमानुष मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ गावातीलच एका व्यक्तीने व्हायरल केल्याचे समजल्यावर नागरगोजे यांनी त्याला संपर्क केला. त्याने दुसर्‍याचे नाव सांगितले. 

 दरम्यान, याप्रकरानंतर दीपक नागरगोजे यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी सकाळी शिरूर पोलिसांनी नागरगोजे यांचा जबाब घेतला आहे. सायंकाळी चार वाजेपर्यंत याची कसलीच नोंद पोलिस ठाण्यात झालेली नव्हती. दरम्यान, बलभीम मळेकर व गावातील काही इतरांकडून आपल्याला नेहमीच त्रास दिला जात असल्याचे दीपक नागरगोजे यांनी जबाबात म्हटले आहे. धारदार शस्त्रासह त्यांनी आपल्यावर हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला. आपल्या पत्नीलाही मारहाण केल्याचेही नागरगोजेंनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.