Tue, Nov 19, 2019 05:03होमपेज › Marathwada › लातूर : दगडफेकीत सात पोलिस जखमी, एक गंभीर

लातूर : दगडफेकीत सात पोलिस जखमी, एक गंभीर

Published On: Jan 03 2018 2:14PM | Last Updated: Jan 03 2018 2:14PM

बुकमार्क करा
लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात सर्वत्र कडकडीत बंद असून, काही वेळापूर्वी निलंगा शहरात दोन गटांत झालेल्या तुफान दगडफेकीत सात पोलिस जखमी झाले. पोलिस गाडीवरही दगडफेक झाल्याने काचा फुटल्या. निलंगा शहरातील दापका वेस परिसरात हा प्रकार घडला. दपका वेशीत बंदचे आवाहन करत एका समाजातील जमाव आला. त्या वेळी तेथील दुसऱ्या समाजातील लोकांशी त्यांचा वाद झाला. त्यानंतर दोनही गटांत  दगडफेक सुरू झाली. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी  हस्तक्षेप केला असता दगफेकीत सहा पोलिस जखमी झाले. त्यात सहायक पोलिस निरीक्षक प्रियांका आघाव या गंभीर जखमी झाल्याने त्याना उपचारार्थ लातूरला हलवण्यात आले. अन्य जखमींची नावे सचिन उत्सुर्गे, सुधीर शिंदे, ये, यन. माशाल, महादेव फुले, एन. यू चव्हाण, अशी आहेत.


दरम्यान, लातुरात शिवाजी चौक नजीक रेल्वे लाईन  परिसरात अज्ञात जमावाकडून एका पान टपवरीवर झालेली किरकोळ दगडफेक वगळता बंद शांततेत सुरू आहे.  रेल्वे लाईन परिसरात एक दोन दुकाने उघडी होती।.बंद करा बंद करा असे ओरडत सुमारे ५० युवकांचा जमाव आला व त्यांनी पान टपरीवर दगड भिरकावले. यात कोणालाही इजा झाली नाही. दरम्यान, जिल्ह्यातही बंदला प्रतिसाद असून अनेक मार्गवर वाहने अडवण्यात येत आहे.