Mon, Aug 19, 2019 11:09होमपेज › Marathwada › शिक्षक नसल्याने शाळेला ठोकले कुलूप

शिक्षक नसल्याने शाळेला ठोकले कुलूप

Published On: Aug 02 2018 1:59AM | Last Updated: Aug 02 2018 1:36AMमाजलगाव : प्रतिनिधी

शहरातील जुना तहसील रोड भागातील जिल्हा परिषदेच्या केंद्रीय शाळा नंबर दोनला बुधवारी पालकांनी कुलूप ठोकले. दोन शिक्षकी असलेल्या या शाळेला या शैक्षणिक वर्षांपासून एकच शिक्षक येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याची तक्रार पालकांनी केली.

जिल्हा परिषद केंद्रीय शाळा क्रमांक 2 मध्ये  31 विद्यार्थी आहेत.  येथे एस. एम. दासरे आणि कैलास चव्हाण या दोन आहेत. शाळा सुरू झाल्यापासून येतील कैलास चव्हाण हे एकदाही शाळेत आले नाहीत. तर दुसरे शिक्षक शिक्षक दासरे शाळेचे टपाल, कार्यालयीन कामकाजात व्यस्त असतात. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत काही शिकवले जात नाही. यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी शाळेला कुलूप ठोकले. जोपर्यंत दुसरा शिक्षक नियुक्त होत नाही तोपर्यंत कुलूप न उघडण्याचा इशारा दीपाली पाटील, अली शेर कुरेशी, अरेफ अहमद खान,  जुनेद कुरेशी, सालेम चाऊस, फेरोज कुरेशी आदी पालकांनी घेतला.