Fri, Jul 19, 2019 17:53होमपेज › Marathwada › साडेसहा लाख पाठ्यपुस्तके दाखल

साडेसहा लाख पाठ्यपुस्तके दाखल

Published On: Jun 10 2018 1:48AM | Last Updated: Jun 10 2018 12:03AMहिंगोली : प्रतिनिधी

जिल्ह्यात सर्व शिक्षा अभियानांतर्गत सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशीच नवीन पाठ्यपुस्तके दिली जाणार असून आतापर्यंत जिल्ह्यासाठी साडेसहा लाख पुस्तकांचा पुरवठा झाला आहे. 

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती नवीन पाठ्यपुस्तके मिळावीत यासाठी शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के,  सर्व शिक्षा अभियानाचे समन्वयक प्रशांत भगत यांनी पुस्तकांची मागणी नोंदवली होती. जिल्ह्यात इयत्ता पहिली ते आठवीच्या एक लाख 54 हजार 863 विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप करावी लागणार असल्याचे त्यांनी कळविले होते. यामध्ये हिंगोली तालुक्यातील चौतीस हजार 588, औंढा तालुक्यातील चोवीस 605, सेनगाव तालुक्यातील सव्वीस हजार 242, कळमनुरी तालुक्यातील 29 हजार 818 तर वसमत तालुुक्यातील 39 हजार 610 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यानुसार सर्व शिक्षा अभियानाने आठ लाख 17 हजार 466 पुस्तकांची मागणी नोंदविली आहे. हिंगोली तालुक्यासाठी एक लाख 83 हजार 326, औंढा तालुक्यासाठी एक लाख 29 हजार 670, सेनगाव तालुक्यासाठी एक लाख 37 हजार 903, कळमनुरी तालुक्यासाठी एक लाख 54 हजार 965 तर वसमत तालुक्यासाठी दोख लाख आठ हजार पुस्तकांचा समावेश आहे.