Thu, Jun 20, 2019 06:47होमपेज › Marathwada › घरकूल याद्यांसाठी मुहूर्त मिळेना 

घरकूल याद्यांसाठी मुहूर्त मिळेना 

Published On: Mar 23 2018 1:58AM | Last Updated: Mar 23 2018 1:48AMबीड : दिनेश गुळवे

सध्याच्या सुरू असलेल्या योजनांमध्ये घरकूल न मिळालेले तसेच हक्काच्या घरापासून वंचित असलेल्या कुटुंबाची यादी शासनाने मागितली होती. ही तारीख संपून तीन महिने होत आली तरी अद्यापही यादी तयार झाली नाही. त्यामुळे ही यादी कधी होईल व वंचितांना हक्काचे घर कधी मिळेल याची प्रतीक्षा अनेकांना लागली आहे. यासंदर्भात वरिष्ठ अधिकार्‍यांच्या सूचनाला केराची टोपली दाखविली जात असल्याने, दुष्काळात तेरावा महिना म्हणण्याची वेळ वंचित ग्रामस्थांवर आली आहे. 

ग्रामस्थांना निवारा मिळावा, हक्काचे घर मिळत त्यांची ऊन, पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी शासनाच्या वतीने अनेक योजनांमधून घरकूल दिले जाते. रमाई आवास योजना, शबरी, इंदिरा गांधी अशा योजना आहेत. या योजनांमध्ये ज्यांना लाभ मिळेलाला नाही व ज्यांना घरकुलाचा लाभ देणे गरजेचे आहे, अशांची यादी शासनाने पंचायत समिती, ग्रामपंचायत यांच्याकडून 31 डिसेंबर 2017 पर्यंत मागविली होती. ही मुदत संपून तीन महिने होत आले, अद्यापही जिल्हा कार्यालयास या याद्या मिळालेल्या नाहीत. या याद्या द्याव्यात यासाठी बैठकीत वारंवार सूचना दिल्या आहेत. या सूचनांना मात्र केराची टोपली दाखविली जात असल्याने या याद्या तयार करण्यास उशीर होत आहे.