Tue, Nov 13, 2018 00:22होमपेज › Marathwada › राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षपदी सक्षणा सलगर

राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षपदी सक्षणा सलगर

Published On: Jun 21 2018 6:33PM | Last Updated: Jun 21 2018 6:33PMउस्मानाबाद : प्रतिनिधी  

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षपदी जिल्हा परिषद सदस्या सक्षणा सिदराम सलगर यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निवड केल्याची घोषणा केली. इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर असलेल्या सक्षणा सलगर या उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्या आहेत.

तेर गावातील एका सामान्य कुटुंबातील असलेल्या सक्षणा सलगर यांच्या कामाची दखल घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांची २०१६ मध्ये राज्याची स्टार प्रचारक म्हणून निवड केली होती. शिवाय त्या पक्षाच्या प्रवक्त्या म्हणूनही काम करत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती संघटनेच्या स्थापनेपासून सक्षणा सलगर या संघटनेमध्ये काम करत आहेत. त्यांच्या कामाची पक्षाने दखल घेतली असून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नियुक्ती जाहीर केली आहे.