होमपेज › Marathwada › #Women’sDay सामान्यांची कामे करणार्‍या सभापती विमल शिंदे 

#Women’sDay सामान्यांची कामे करणार्‍या सभापती विमल शिंदे 

Published On: Mar 08 2018 2:06AM | Last Updated: Mar 08 2018 2:06AMवडवणी : अशोक निपटे

वडवणी पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यातील सर्वच गावातील नागरिकांचे प्रश्‍न सुटले पाहिजेत, महिला मुलींना न्याय मिळाला पाहिजे यासाठी  प्रयत्न करणार्‍या सभापती म्हणून वडवणी पंचायत समितीच्या सभापती   विमल गणेश शिंदे यांचे नाव घ्यावे लागेल. 

गेल्या वर्षी विमल शिंदे वडवणी पंचायत समितीच्या सभापती म्हणून विराजमान झाल्या अन तालुक्यातील महिलांची कामे झपाट्याने होऊ लागली. कोणत्या अधिकारी अथवा कर्मचार्‍यांनी किती झपाट्याने काम करावे हे समजून सांगण्याची योग्य भाषा त्यांनी अवगत केली. तालुक्यातील रस्ते, पाणी, आरोग्य या सारख्या मूलभूत सुविधा लोकांना मिळतात की नाही याची काळजी त्यांच्याकडून घेतली जाते. निराधारांना अनुदान, गरोदर मातांना पोषण आहार, शालेय विद्यार्थ्यांना आरोग्याच्या सुविधा मिळवून देणे शिवाय बचत गटाच्या माध्यमातून महिलांना कर्जपुरवठा मिळवून देणे. या सारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध देण्यासाठी सभापती  विमल गणेश शिंदे अग्रेसर आहेत. तालुक्यातील अनेक गावात जाऊन त्यांनी विविध विकास कामांची पाहणी केली. आरोग्य केंद्राच्या सर्व योजनांची माहिती गावागावात जाऊन त्यांनी दिली. वैद्यकीय तपासणी करून योग्य उपचार करण्यात येतात की नाही याची खातरजमा सरकारी दवाखान्यात जाऊन त्यांनी करून घेतली.

माजी मंत्री प्रकाश सोळंके, सोमनाथराव बडे, तालुकाध्यक्ष बजरंग साबळे यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील नागरिकांचे कामे चांगल्या पद्धतीने करण्याची जिम्मेदारी त्या पार पाडीत आहेत.