Thu, Apr 25, 2019 16:11होमपेज › Marathwada › केजमध्ये दरोडेखोरांनी सराफाला कारखाली चिरडून दागिने लुटले

केजमध्ये दरोडेखोरांनी सराफाला कारखाली चिरडून दागिने लुटले

Published On: Feb 14 2018 8:37AM | Last Updated: Feb 14 2018 8:37AM केज : दीपक नाईकवाडे  

केज येथे  कारमधून आलेल्या दरोडेखोरांनी सराफ व्यापाऱ्याच्या मोटारसायकलला पाठीमागून धडक देत सोन्याची बॅग लंपास केल्याची घटना घडली आहे.  यात विकास थोरात हे जागीच ठार झाले आहेत. या घटनेनंतर कारमधून पळ काढणार्‍या दरोडेखोरांपैकी एकाला संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.  या घटनेच्या पार्श्वभूमीवर केज सराफा बाजारपेठ बंद ठेवण्यात येणार आहे.

केज येथील सराफा बाजारापेठेतील कृष्णाई ज्वेलर्स या सोन्याचांदीच्या दुकानाचे मालक विकास थोरात मंगळवारी  रात्री आठ वाजता दुकान बंद करून सोन्या चांदीच्या दागिन्याची बॅग घेऊन अंबाजोगाईकडे जात असताना माऊली जिनिंग जवळ त्यांच्या मोटारसायकला पाठीमागून इंडिगो क्रमांक एमएच 0९ एबी ६८४७ धडक दिली.  विकास थोरात हे मोटारसायकलवरुन खाली पडल्यावर त्यांच्या अंगावर इंडिका घालून त्यांच्या जवळील सोन्याची बॅग दरोडेखोरांनी लंपास केली. हा प्रकार पाठीमागून आलेल्या वाहनचालकासह माऊली जिनिंग जवळ राहणार्‍या नागरिकांच्या लक्षात येईपर्यंत दरोडेखोरांनी पळ काढला होता. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी  परिसरातील गावातील नागरिकांना याप्रकाराबद्दल माहिती दिली. संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष राहुल खोडसे यांनाही मोबाईल वरुन सराफा व्यापारी किशोर थोरात यांना धडक देऊन कार धनेगावकडे आल्याची माहिती मिळाली. 

त्यांनी संबंधित कार थांबवून सराफ व्यापार्‍याला धडक दिलेल्या दरोडेखोरांना बॅग कुठे आहे याची विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. कारची झडती घेतली असता बॅग आढळून आली.  नागरिकांचा जमाव जमा झाल्याने इंडिकातील एकाने रिव्हॉल्वर काढून धमकावत कारमधील चार पाच दरोडेखोरांनी खाली उतरून पळ काढला. त्यातील एक दरोडेखोर पळून जाताना विहिरीमध्ये पडला. वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी घटनास्थळी धाव घेवून विहरीत पडलेल्या दरोडेखोरास विहरीत दावे सोडून बाहेर काढत ताब्यात घेतले आहे. 

संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष राहुल खोडसे यांच्यासह मयूर कदम,मयूर टोम्पे,शामसुंदर खोडसे,औदुंबर रांजनकर व इतर तरुणांनी आपल्या जिवाची पर्वा न करता दरोडेखोरांचा पाठलाग करून एका दरोडेखोराला पकडून दिले.