Tue, Jul 16, 2019 21:56होमपेज › Marathwada › तालुक्याच्या मागणीसाठी भरउन्हात रास्ता रोको  

तालुक्याच्या मागणीसाठी भरउन्हात रास्ता रोको  

Published On: Apr 18 2018 12:50AM | Last Updated: Apr 17 2018 10:46PMबीड : प्रतिनिधी

बीड तालुक्यातील पिंपळनेर शहराला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी पिंपळनेर परिसरातील तरुणांनी मंगळवारी सकाळी 11 च्या दरम्यान घाटसावळी येथे भर उन्हात दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी तरुणांनी घोषणाबाजी करीत 50 वर्षांपासूनची मागणी मान्य करा असा आग्रह धरला.

पिंपळनेर हे बीड तालुक्यातील मोठे व बाजारपेठ असलेले गाव आहे.  पिंपळनेर गावाला तालुक्याचा दर्ज द्यावा, अशी मागणी 50 वर्षांपासूनची आहे. अंबाजोगाई जिल्हा करावा, यासाठी आंदोलन सुरू आहे. अंबाजोगाई जिल्हा झालाच तर पिंपळनेर तालुका करावा, या मागणीसाठी मंगळवारी घाटसावळी येथे बीड-परळी रोडवर पिंपळनेरसह परिसरातील ग्रामस्थांनी उन्हाची पर्वा न करता रस्त्यावर ठिय्या मांडून दोन तास आंदोलन केले. 

नायब तहसीलदार यांनी पिंपळनेर परिसरातील नागरिकांचे निवेदन स्वीकारून आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. या दरम्यान,  पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला होता. या आंदोलनात माजी मंत्री बदामराव पंडित, माजी जि. प. सदस्य चंद्रकांत पेंढारे, सुनील पाटील, परमेश्वर सातपुते, मनोज पाटील, सुंदर चव्हाण, गणपत डोईफोडे, बिभीषण घुमरे, चंद्रकांत फड, अरुण लांडे, नानाभाऊ जाधव, राजाभाऊ गवळी, प्रफुल्ल चरखा, भारत जवळकर, अरुण भोंगाणे आदी गावातील  ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags : Marathwada, roadblock, march, Taluka, demand