Thu, Mar 21, 2019 15:25होमपेज › Marathwada › ‘रेशीम’ स्पर्शाने झाडगावात कोट्यवधींची उलाढाल

‘रेशीम’ स्पर्शाने झाडगावात कोट्यवधींची उलाढाल

Published On: Mar 04 2018 11:12AM | Last Updated: Mar 04 2018 11:12AMनागपूर ः प्रतिनिधी

यंदा बोंडअळी व गारपिटीने झालेल्या नुकसानीमुळे शेतकर्‍यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला. मात्र वर्धा जिल्ह्यातील झाडगावातील शेतकर्‍यांना या अस्मानी आणि सुलतानी संकटाचा फटका बसला  नाही. या शेतकर्‍यांनीकेवळ कापसावर अवलंबून न राहता तुतीची लागवड करून रेशीम शेतीच्या जोरावर आर्थिक संपन्नता मिळवली आहे. यामुळे गावातील शेतकर्‍यांची उलाढाल 75 लक्ष ते 1 कोटी  रुपये एवढी होत आहे. 

तुमच्याकडे शेतीमध्ये जलसिंचनाची व्यवस्था असेल आणि तुम्हाला 50 हजार रुपये महिना कमवायचा असेल तर रेशीम शेती हा अतिशय उत्तम पर्याय ठरू शकतो. हे  झाडगावातील शेतकर्‍यांनी सिद्ध करून दाखविले आहे. तुतीची एकदा लागवड केली की 12 वर्षे मासिक उत्पन्न देणारे पीक म्हणून याकडे पाहिले जाते. जिल्ह्यातील झाडगावच्या 20 शेतकर्‍यांनी हा  पर्याय निवडला आहे. झाडगाव आता रेशीम शेतीचे गाव म्हणून जिल्ह्यातच नव्हे तर इतरत्रही नावारूपासआले आहे. वर्धा शहरापासून 25 किलोमीटर अंतरावर असणारे हे रेशीम गाव, अशी  ओळख  निर्माण केलेले झाडगाव आहे. अडीच हजार लोकसंख्येचे हे गाव काही वर्षांपूर्वी इतर गावांसारखेच एक सर्वसाम ान्य गाव होते. येथील शेतकरीसुद्धा कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा, हेच  पारंपरिक पिके  घेत होते. नैसर्गिक आपत्ती आली की शेतकरी अडचणीत सापडत असत.

झाडगाव हे रेशीम शेतीच्या तलम स्पर्शाने अक्षरश: कात टाकत आहे. गावातीलच भोजराज भांगडे यांनी पहिल्यांदा 12  वर्षांपूर्वी 1 एकरमध्ये रेशीम शेतीचा प्रयोग केला. रेशीम कार्यालयातून त्यांनी याविषयी माहिती घेतली. सहा महिन्यातच त्यांना दरमहा उत्पन्नाचा कायमस्वरुपी स्त्रोत निर्माण झाला. त्यानंतर त्यांनी 1 करमध्ये उत्पादीत केलेले कोष त्यांनी कर्नाटक, आंध्रप्रदेशमध्ये जाऊन विकले. यातून त्यांना फायदा दिसू लागल्यावर त्यांनी हळुहळू लागवड क्षेत्र वाढवले.  

भांगडे यांनी आता साडेचार एकरमध्ये तुतीची लागवड केली आहे. सध्या ते साडेचार एकर शेतीतून 8 वेळा रेशीम कोष उत्पादन घेतात. त्यांना एकावेळी 500 अंडीपुंजपासून सरासरी 3.50 क्विंटल  उत्पादन एक महिन्यात मिळत आहे. एक क्विंटलला साधारणपणे 50 हजार रुपये भाव मिळतो. म्हणजे एक महिन्यात त्यांना सुमारे 1 लाख 75 हजार रुपये उत्पन्न मिळते त्यातून ते वर्षाला 14 लाख  रुपये कमवितात. त्यांच्यापासून प्रेरणा घेत यंदा बहुसंख्य शेतकर्‍यांनी रेशीम शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे.