Sun, Feb 24, 2019 09:34होमपेज › Marathwada › चिंचोरा तलावाचेे पाणी आरक्षित करा

चिंचोरा तलावाचेे पाणी आरक्षित करा

Published On: Mar 23 2018 1:58AM | Last Updated: Mar 23 2018 12:31AMचिंचोरा तलावातून शेतकर्‍यांनी विद्युत पंपाच्या साहाय्याने शेतीसाठी पाणी उपसा सुरू केला आहे. बहुतेक शेतकर्‍यांनी या पाझर तलावाच्या पाण्याच्या आधारे भुईमूग हे पीक घेतले आहे. या उपशामुळे तलावातील पाण्याची पातळी मात्र दररोज कमी होताना दिसत आहे. आगामी उन्हाळयाच्या हंगामात तीव्र पाणीटचाईला नागरिकांना सामोरे जावे लागणार आहे. यावर्षी पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे गावाला तीन दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. तलावात शेतकर्‍यांनी विद्युत मोटारीच्या साहाय्याने पाणी उपसा सुरू केला आहे. या पाण्यावरच हातपंपाचीही मदार आहे. परंतु महिनाभरापासून तलावातुन विद्युत मोटारीद्वारे पाणी उपसा होत आहे.तलावावर सध्या जवळपास 75 ते 100 विद्युत मोटारी चालू असल्याने पाणीसाठ्यात घट चालू झाली आहे. उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते. गतवर्षीची स्थिती लक्षात घेऊन भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये म्हणून तलावातील चिंचोरा तलावातील पाणी आरक्षित करावे व विद्युत मोटारी बंद कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. महसूल प्रशासनाने सांगूनदेखील संबंधित पंपचालक याकडे दुर्लक्ष करीत आहेत. प्रशासनाने तत्काळ लक्ष दिले नाही तर भविष्यात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटंकती करावी लागणार आहे हे मात्र तेवढेच खरे समजावे लागणार आहे.