Sat, Nov 17, 2018 07:58होमपेज › Marathwada › अल्पवयीन मुलीवर बलात्कार, माजलगावचे पाच प्रतिष्ठित ताब्यात 

अल्पवयीन मुलीवर बलात्कार, माजलगावचे पाच प्रतिष्ठित ताब्यात 

Published On: Jan 16 2018 7:59PM | Last Updated: Jan 16 2018 7:59PM

बुकमार्क करा
माजलगाव : प्रतिनिधी 

नादेंड येथील अल्‍पवयीन मुलीवर झालेल्‍या आत्याचार प्रकरणी माजलगामधील पाच प्रतिष्‍ठित व्यक्‍तिंना पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहे. माजी नगरसेवक खलिल पटेल, नवाब पटेल, शेख इद्रीस पाशा, आसलम मिर्झा आणि शेख रफी अशी अटक करण्यता आलेल्‍यांची नावे आहेत. साबेर फारोखी याच्यावर या बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संशयीत आरोपी शाबेर पाशा (फारोखी) याने एका मुलीला आपल्या मोबाईलमधील अश्लिल चिञ दाखवत बलत्कार केला. तर, दुसऱ्या एका मुलीचा विनयभंग केला आणि ही बाब पोलिसांना सांगितल्‍यास जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी अटक करण्यात आलेल्‍या पाच व्यक्‍तिींनी यात हास्तक्षेप करुन तडजोड करण्याचा प्रयत्‍न केला. त्‍यामुळे अधिक तपासासाठी पोलिसांनी या पाच जणांना ताब्‍यात घेतले.