Sun, Jul 12, 2020 22:41होमपेज › Marathwada › बलात्कार्‍यांना फाशीची शिक्षा द्या

बलात्कार्‍यांना फाशीची शिक्षा द्या

Published On: Apr 22 2018 1:12AM | Last Updated: Apr 21 2018 11:13PMऔंढा नागनाथ : प्रतिनिधी

कठुआ, उन्‍नवा, सुरत पटणा, बालासोर, ग्रेडर नोएडा बलात्कार्‍याच्या घटना घडल्या होत्या. या घटनेतील आरोपींना त्वरीत फाशीची शिक्षा देण्यात यावी. यासाठी हिंगोली-औंढा नागनाथ महामार्गावरील बोरजा फाट्यावर शनिवारी दि.21 एप्रिल रोजी सकाळी दीड तास रास्ता रोको आंदोलन करून निषेध नोंदविण्यात आला. यावेळी आपल्या मागणीचे निवेदन औंढा नागनाथ नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव यांना देण्यात आले.

बलात्कार आणि हत्यामुळे देशात अराजकता पसरून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्व सांप्रदायाकडून करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलन करून घटनेतील आरोपींना तत्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी. अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.

निवेदनातील सर्व मागण्या शासनाकडे पाठविण्यासाठी तहसील प्रशासन बांधील असल्याचे नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव यांनी आश्‍वासन दिल्यावर रास्ता रोको आंदोलन थांबविण्यात आला. त्यानंतर काही खंडित झालेली वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.

आ.बाळापूरच्या पोलिस निरीक्षकांना निवेदन

आखाडा बाळापूर : जम्मू काश्मीर राज्यातील कठुआ, उत्‍तर प्रदेशातील उन्‍नवा व गुजरातमधील सुरतसह अनेक ठिकाणी लहान चिमुकली मुली व महिलांवर समाज विघातक शक्‍तींनी अत्याचार केले. त्यामुळे अशा घटनेतील आरोपींना कडक शासन करावे या प्रमुख मागणीचे मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने आखाडा बाळापूर पोलिस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले.मागील काही वर्षांपासून मुलींसह महिलांवर अत्याचार होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यात गेल्या काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीर, उत्‍तर प्रदेश आणि गुजरात या राज्यांत लहान मुली व महिलांवर समाज विघातक शक्‍तींनी अत्याचार केले. 

या घटनेेचा आखाडा बाळापूर येथील मुस्लिम समाज बांधवांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्‍त करण्यात आला. अशा घटनेतील आरोपींना तत्काळ फासावर लटकवून अत्याचारित मुली व महिलांना न्याय द्यावा अशा मागणीचे निवेदन आ.बाळापूर पोलिस निरीक्षकांना देण्यात आले. तसेच यांच्यामार्फत राष्ट्रपती यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. निवेदनावर शकील अहेमद, सरपंच म.जिया कुरेशी, मौलाना नसीम बेग आश्रफी, स.असद कादरी, सय्यद शफी, शेख फारूख आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

हट्टा येथे सर्वपक्षीय कँडल मार्च

हट्टा : कठुआ, उन्‍नवा व सुरत येथे चिमुरडीवर अत्याचाराची घटना घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ वसमत तालुक्यातील हट्टा येथील पोलिस ठाण्यावर शुक्रवारी रोजी सायंकाळच्या सुमारास सर्व पक्षीय कँडल मार्च काढण्यात आला. यावेळी परिसरातील अनेक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. गेल्या काही दिवसांपासून हृदयद्रावक घटना घडल्या आहेत. या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी हट्टा येथे सर्वपक्षीय यांच्या वतीने कँडल मार्च काढण्यात आला. यावेळी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन पोलिस ठाणे यांच्यामार्फत राष्ट्रपतींना पाठविण्यात आले. यामध्ये बालासाहेब बारहाते, शेख सादीक, अरविंद खाडे आदींनी मनोगत व्यक्‍त केले. कँडल मार्च हट्टा बसस्थानक मार्गे बाजार चौक, जामा मस्जीद, गणपती मंदिर, गौसूलवरा मस्जीद ते पोलिस ठाणे असा काढण्यात आला. यावेळी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील नाईक यांना देण्यात आले. निवेदनावर शेख नसीम, शेख मैनोद्दीन, मोहीब सिद्दीकी, अकबर मिस्त्री, मनोज परिहार, खालेद सुल्तानमियाँ, अस्लेम पटेल, राजू खाडे, शेख मुन्‍ना, हाफेज आबेद, परिहार, संतोष शिंदे, जगदीश खाडे, शेख जैनोद्दीन, अशोक घोडके आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.